Wednesday, November 21, 2018

“आपले सरकार” मधील संगणकपरिचालकांच्या ट्विट हल्ल्या पुढे शासन निरुत्तर ! #संगणकपरिचालक ट्विटर वर देशात प्रथम क्रमांकाच्या ट्रेडीगवर महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी! मुंबई(प्रतींनिधी) मागील ७ वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या माध्यामातून ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम तुटपुंज्या मानधनावर करत आहेत,संगणकपरिचालकांमुळे राज्यशासनाला सलग ३ वर्ष प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे ७ वर्षाच्या सेवेची दखल घेऊन शासनाने संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची एकच मागणी असून त्यासाठी आज २१ रोजी रात्री १२.०१ मी. पासून ते रात्री १२ पर्यंत असा २४ तास ट्विटर या सोशल मीडियावरील माध्यमाचा वापर करून संगणकपरिचालक ट्विट मोर्चा करत आहेत,या अनोख्या मोर्चात राज्यातील हजारो संगणकपरिचालक हे #संगणकपरिचालक या हॅशटॅगचा वापर करून शासनाकडे विविध मागण्या मांडत आहेत,मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येत ट्विट केल्यामुळे ट्विटर वर देशात प्रथम क्रमांकाच्या ट्रेडींगवर संगणकपरिचालक गेले आहेत.संगणक पारिचालकांच्या ट्विट हल्ल्यापुढे शासन मात्र निरुत्तर झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त की मागील ७ वर्षापासून ग्रामीण भागामध्ये डिजिटल महाराष्ट्र अंतर्गत संग्राम पप्रकल्प तसेच आत्ताचा आपले सरकार प्रकल्प या प्रकल्पात २८७६१ ग्रामपंचायती,३५१ पंचायत समिती व ३४ जिल्हा परिषदेत काम करणार्‍या संगणकपरिचालकांना ६००० रुपये असलेले तुटपुंजे मानधन सुद्धा १- १ वर्ष मिळत नाही.आज एकीकडे संगणकपरिचालकावर उपासमारीची वेळ आलेली असताना दुसरीकडे आपले सरकार प्रकल्प चालवणारी कंपनी कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करत असताना शासन त्या कंपनीला पाठीशी घालत आहे.मागील ७ वर्ष केलेली सेवा गृहीत धरून शासनाने राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना समान काम समान वेतन या तत्वा नुसार संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी या एकाच मागणी साठी मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर २७ नोव्हेंबर रोजी मोर्चा काडण्यात येणार आहेतत्पूर्वी शासनाचे आपल्या मागणी कडे लक्ष वेधण्यासाठी ट्विटर वर आज २१ रोजी रात्री १२.०१ मी ते रात्री १२ वाजे पर्यंत असा २४ तासाच्या अनोख्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते,त्यात शासनाच्या वतीने मागील ४ वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस,ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे संगणकपरिचालकानी त्यांना ट्विट,रिट्विट करून प्रश्नांचा व मागणीचा भडीमार केला,संगणक परिचालकांच्या या ट्विट हल्ल्या पुढे शासनाकडून कुठलेच उत्तर मिळाले नसून शासन निरुत्तर झाले. जो पर्यंत शासन निर्णय देणार नाही तो पर्यंत संघर्ष सुरूच राहणार – सिद्धेश्वर मुंडे ट्विट मोर्चा च्या माध्यमातून राज्यातील हजारो संगणक परिचालकानी सहभाग घेतल्यामुळे देशमध्ये ट्विटर च्या ट्रेडीगवर #संगणकपरिचालक हे हॅशटॅग प्रथम क्रमांकावर आले असून,जगातील हा पहिलाच ट्विट मोर्चा होता,तसेच देशातील पहिलीच संघटना आहे जीने अशा प्रकारचा ट्विट मोर्चा काडला,या माध्यामातून आम्ही आमची मागणी राज्य शासनासमोर ठेवली आहे,त्याच बरोबर २७ नोव्हेंबरला मुंबई येथे अधिवेशनावर मोर्चा काडण्यात येणार असून त्यात हजारो संगणकपरिचालक सहभागी होणार आहेत,जो पर्यंत शासन निर्णय देणार नाही तो पर्यंत संगणक परिचालकांचा संघर्ष सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली. #संगणकपारिचालक हे मराठी हॅशटॅग असताना ट्विटर वर देशात क्रमांक १ एक वर ट्विटर हे सोशल मीडियावर असलेले आंतरराष्ट्रीय माध्यम असून यावर सरासरी हॅशटॅग हा इंग्लिश मधून असतो आणि इंग्लिश भाषेचा वापर ट्विटर वर होतो पण आज राज्यातील संगणकपरिचालकांनी मराठी भाषेत असलेल्या हॅशटॅगचा वापर केला त्यात #संगणकपारिचालक हे #संगणकपारिचालक ट्विटर वर देशात प्रथम क्रमांकावर होते .

Thursday, November 1, 2018

राष्ट्रवादीचे "बॅलन्स चेक करो"आंदोलन

*_पंधरा लाखाच्या आश्वासनाची अपेक्षेप्रमाणे  घोर निराशा !_* *राष्ट्रवादीचे "बॅलन्स चेक करो"आंदोलन ठरले  लक्षवेधी ; व्यंगात्मक गाजर हलवा वितरण*   परळी वैजनाथ ।प्रतिनिधी. .      प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या फसव्या अश्वासनांची खिल्ली उडवत ना. धनंजय मुंडे यांच्यामार्गदर्शनाखाली खात्यावर पंधरा लाख खरेच जमा झाले का? अशी उलट तपासणी  "बॅलन्स चेक करो" या अभिनव आंदोलना द्वारे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.बँकेत जाऊन पासबुक एन्ट्री करून आंदोलन करण्यात आले. पंधरा लाखाच्या आश्वासनाची अपेक्षेप्रमाणे घोर निराशा झाली म्हणून सरकारच्या फसव्या आश्वासनांचे  व्यंगात्मक गाजर हलवा वितरण करुन आंदोलनाकडे लक्ष वेधण्यातआले. या नाकर्त्या सरकारच्या विरोधात सामान्य माणसाला किती चीड येते हे आजच्या आंदोलनातून दिसुन आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितले.          राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंडिया बँके समोर  "बॅलन्स चेक करो" असे अभिनव आंदोलन करण्यात आले.नागरिकांनी पासबुके घेऊन येत  खात्या वरील जमा तपासून घेत मोठा प्रतिसाद या आंदोलनात नोंदवला. आंदोलनातून सरकारची फसवेगिरी दाखवून देण्यात आली. पासबुक तपासलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने गाजर हलवा वाटप करण्यात आला. स्टेट बँक ऑफ ईंडिया च्या आवारात नागरिकांची तोबा गर्दी झालीहोती.आंदोलनस्थळी  रणजीत गोंधळी आणि चमु ने " या मोदीने केलिया नोटबंदी" "कल्लोळाच पाणी कशाला ढवळील सामान्य नागरिकला कशाला खवळील" यासह अनेक मोदी सरकार विरोधी आणि सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्या चे लोकसंगीतपर गीते सादर केली.        या आंदोलनात जेष्ठ नेते बन्सीधर सिरसाट, रायुकाॅ प्रदेश उपाध्यक्ष  डॉ. संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी, डॉ. खाजा युसुफ खान, बाळासाहेब देशमुख, सुरेश टाक, अय्युब पठाण, चंदुलाल बियाणी, दिपक देशमुख, जाबेर खॉ पठाण, माणिकभाऊ फड, दत्ताञय गुट्टे, गोपाळ आंधळे, विजय भोयटे, किशोर पारधे, अनिल अष्टेकर, अनंत इंगळे, अजीज कच्छी, महेबुब कुरेशी, संजय फड, जयपाल लाहोटी, जयप्रकाश लड्डा, राजेंद्र सोनी, किशोर केंद्रे, रवी मुळे, बाबासाहेब गंगाधरे, ताज खॉ पठाण, नाझेजहुसेन, गोविंद कुकर, पांडूरंग गायकवाड, शंकर आडेपवार, महादेव रोडे, प्रा. रघुनंदन खरात, बालाजी चाटे, दत्ताभाऊ सावंत, महेंद्र रोडे, शकील कच्छी, जोवद कुरेशी, शंकर कापसे, प्रितम जाधव, धोंडीराम धोञे, जयदत्त नरवटे, बळीराम नागरगोजे, सुभाष वाघमारे, अजय जोशी, सुरेशी गित्ते, सय्यद सुजात अली, जमील अध्यक्ष, नारायण मुंडे, राजाभाऊ स्वामी, के. डी. उपाडे, श्रीहरी कवडेकर, एम. के. गित्ते, दिलीपराव देशमुख, रामा चव्हाण, रवि आघाव, मोईन काकर, सचिन जोशी, पापा ठाकूर, वाजेद खॉन रफीक पटेल, शेख शम्मो, रमेश मस्के, वैजनाथ जोशी, बलराज सोळंके, बालाजी गित्ते, सतीष गंजेवार, ज्ञानेश्वर होळंबे, शरद चव्हाण, इम्रान शेख, श्रीपाद पाठक, सय्यद फेरोज, नेमीनाथ आदोडे, गुलाब खॉन पठाण, शेख अमिर, पाशा पठाण, सखाराम गित्ते, सतीश गित्ते, भारत फकीरा,नवनाथ कुकर, सय्यद अल्लाउद्दीन नसीर, सोमनाथ ओपळे, व्ही. के. पवार, ए. एन. शेप, फुलचंद गायकवाड, सय्यद जमील,विजय मिसाळ, आली, मुबीन, अरबाज, रईस, शेख अनसर, उस्मान चॉंद, अजीज खतीब, भागवत गित्ते, रमेश पवार, शामराव पवार, दिलीप बुंदिले,शेख हसन, शेख मुश्ताक,अमर रोडे,तौफिक कच्छी, शेख चॉंद, अजमत खान, इम्रान शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ●●●●●●● *इंडिया बँकेसंबंधी मागण्या :*  नादुरूस्त एटीएम दुरूस्त करणे व एटीएममध्ये जमा पुंजी ठेवणे.,अपंग व वयोवृध्दांसाठी स्वतंञ कक्षाची निर्मिती करणे.,विद्यार्थ्यांसाठी चलन भरण्याची स्वतंञ निर्माण करणे.,शहराची व्याप्ती लोकसंख्या पाहता भारतीय स्टेट बॅंकेची वाढीव शाखा स्थापन करावी.,एटीएम विड्रोल रक्कम मर्यादा वाढवावी.बॅंकेचे व्यवहारांतर्गत अतिरिक्त भार कमी करावा. ●●●●●  *इंडिया बॅंकेने घेतला आंदोलनाचा धसका. ..*       राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅलन्स चेक करो या  अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  मोठ्या संख्येने पासबुक एन्ट्रीसाठी तोबा गर्दी होणार हे अपेक्षित धरुन बँकेने आंदोलनाचा धसका  घेत आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आपल्या खातेदारांना खात्यावरील  बॅलन्स चे  एसएमएस सोडण्यात आले असल्याचे दिसून आले.

Tuesday, October 23, 2018

नवीन दुष्काळ संहिता रद्द झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही

नवीन दुष्काळ संहिता रद्द झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक - ना.धनंजय मुंडे मुंबई, दि. 23 :- ‘दुष्काळ संहिता-2016’च्या निकषांमुळे अनेक तालुके आणि गावे मदतीपासून वंचित राहणार असल्याने जोपर्यंत ती संहिता रद्द होत नाही व पूर्वीची आणेवारी पद्धत लागू होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेली दुष्काळसदृश परिस्थिती घोषणा फसवी व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. शेतातली उभी पिके करपून गेली आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काऐवजी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे. दुष्काळामुळे दुधउत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली पाहिजे. पशुधन वाचवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. टँकर मंजूरीचे अधिक स्थानिक स्तरावर दिले पाहिजेत. कृषीपंपांची वीजबीलांची वसूली थांबवण्याऐवजी ती माफ करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचेही श्री. धनंजय मुंडे यांनी सांगितले. केंद्राचं पथक आल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याची घोषणाही फसवणूक करणारी आहे. केंद्राचे पथक कधी येणार ? कधी पाहणी करणार ? त्यानंतर दुष्काळाची कधी घोषणा होणार ? याबाबत मुख्यमंत्र्यांनी निश्चित काहीच सांगितलं नाही. हा वेळकाढूपणा असून मुख्यमंत्र्यांची आश्वासने पोकळ आहेत. राज्यात 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. ठोस व तात्काळ उपाययोजना लागू कराव्यात. सहनशीलतेचा अंत बघू नये. असे श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

Sunday, October 21, 2018

फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श शाळा पुरस्काराचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण

न.प.शिक्षणसमिती आयोजित  फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श शाळा पुरस्काराचे दि.25 रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण परळी प्रतिनिधी ः  नगर परिषद शिक्षण समिती, डॉ.भालचंद्र वाचनालय परळीच्या वतीने क्रांतीबा ज्योतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्शशाळा पुरस्काराचे वितरण दि.25 रोजी विधान परिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केले आहे.     न.प.शिक्षण समितीच्या वतीने गतवर्षीपासून परळी शहर व परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. यावर्षी या पुरस्काराबरोबरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार आहे. दि.25 ऑक्टोबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे दु.4 वा. होत असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते पि.एस.घाडगे, जि.प.सदस्य अजय मुंडे, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, गटनेते वाल्मीक कराड, शिवसेना जेष्ठ नेते अभयकुमार ठक्कर, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, रा.काँ.शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पं.स.सभापती सौ.कल्पनाताई सोळंके, कृ.उ.बा.स.अ‍ॅड.गोविंद फड, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, मा.बांधकाम सभापती शरद मुंडे, मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष चंदुलाल बियाणी, मा.नगराध्यक्ष दिपक देशमुख,  रा.काँ.सामाजिक न्यायविभाग जिल्हाध्यक्ष विनोद जगतकर, बांधकाम सभापती रेहानबी शेख शरिफ, पाणीपुरवठा सभापती सौ.प्राजक्ता भावड्या कराड, स्वच्छता सभापती विजय भोयटे, महिला व बालकल्याण सभापती सौ.मिना पांडूरंग गायकवाड, उपसभापती सौ.कमल कुकर यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमात प्रा.अरुण पवार यांना कला व साहित्य पुरस्कार तर एस.एस.रॉय, सौ.शोभा भंडारे, रमेश कोमावार, सय्यद अब्दुल गनी, सुलभा वाघमारे, सिद्धेश्‍वर इंगोले, सौ.सुष्मा खंदारे, मदन इंगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर ए.पी.मुंडे यांना क्रिडा पुरस्कार आणि सय्यद अन्वर जाफर यांना विशेष तर पांडूरंग भगवान यादव यांना वृक्षमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात अंकुश माणिक फड व रतन हरी मुंडे यांना विशेष ग्रामीण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात राजस्थानी पोतदार लर्न स्कुल, फाऊंडेशन स्कुल, भेल स्कुल या इंग्रजी माध्यम व उर्दू माध्यमातील अंजूमन उललूम विद्यालय, मिलीया हायस्कुल, बिलाल हायस्कुल, प्राथमिक विभागातून संस्कार प्रा.शाळा, अभिनव प्रा.विद्यालय, जि.प.प्रा.शाळा क्रं.2 जगतकर गल्ली, ग्रामीण भागातून जि.प.प्रा.शा.देशमुख टाकळी या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी व परिसरातील शिक्षण प्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, ग्रंथपाल रावसाहेब जाधव यांनी केले आहे.

Thursday, October 11, 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!

*अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!
*
● _मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ ●

परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....
          अन्यायकारक व  चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली असुन जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी पावर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.
    सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी  शहर भारनियमन मुक्त ठेवणे आवश्यक आहे.  या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे या मागणीसाठी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी सायंकाळी ७ वा. गणेशपार पासुन  पाॅवर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार आहे.
    या चुकीच्या भारनियमन व अन्यायकारक सरकारी धोरणांविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी कंदील मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांनी केले आहे.

Wednesday, October 10, 2018

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
विजय फणशीकर आणि रमेश पतंगे यांना 
लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
 मुंबई,दि.10:पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा 2016 आणि 2017 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
 राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विकास वार्तांकनासाठी 2016 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकरपुरस्कार हा दै. पुढारी, रत्नागिरीचे राजेश जोष्ठे यांना तर 2017 साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलवडे, दै. सकाळ, कोल्हापूरचे बातमीदार यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे. तर 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे इतर सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या विविध पुरस्कारांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ते पुरस्कार खालीलप्रमाणे
वर्ष-2016–
बाळशास्त्री जांभेकरपुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.
अनंतगोपाळशेवडेपुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई
बाबूरावविष्णूपराडकरपुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई
मौलानाअबुलकलामआझादपुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - महंमद अब्दुल मुख्तार (आबेद),प्रतिनिधी, दै. गोदावरीऑब्झर्वर, नांदेड
यशवंतरावचव्हाणपुरस्कार शासकीयगट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) -वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती वजनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
पु.ल.देशपांडेउत्कृष्टदूरचित्रवाणीवृत्तकथापुरस्कार(राज्यस्तर) कपिल श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव
छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कारशासकीयगट (मा.वज.) (राज्यस्तर) प्रज्ञेश कांबळी, छायाचित्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई - सकाळ, कोल्हापूर
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै.तरूण भारत, सातारा.
दादासाहेबपोतनीसपुरस्कार,नाशिकविभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर- (51 हजाररुपयेमानचिन्हवप्रशस्तीपत्रव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गांवकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)
अनंतरावभालेरावपुरस्कार,औरंगाबादविभाग (लातूरसह) डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक,
दै. लोकमत, लातूर
आचार्यअत्रेपुरस्कार,मुंबईविभाग-मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई
नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,पुणेविभाग- ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे
शि.म.परांजपेपुरस्कार,कोकणविभाग- माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे
ग.गो.जाधवपुरस्कार,कोल्हापूरविभाग- संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग
लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,अमरावतीविभाग- अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती
ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,नागपूरविभाग- मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर
वर्ष-2017 -
बाळशास्त्री जांभेकरपुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)-लुमाकांत नलवडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर
अनंतगोपाळशेवडेपुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)- मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर

बाबूरावविष्णूपराडकरपुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर)- राजकुमार सिंह, मुख्यप्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई

मौलानाअबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)- खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई

यशवंतरावचव्हाणपुरस्कारशासकीयगट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी , नाशिक

पु.ल.देशपांडेउत्कृष्टदूरचित्रवाणीवृत्तकथापुरस्कार(राज्यस्तर)- कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली

तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कार (राज्यस्तर)- दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई

केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कारशासकीयगट (मा.वज.) (राज्यस्तर)- मनीष झिमटे, छायाचित्रकार, अमरावती

सोशल मीडिया पुरस्कार(राज्यस्तर)- संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार(राज्यस्तर)- मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद

दादासाहेबपोतनीसपुरस्कार,नाशिकविभाग- अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्यमराठी , धुळे - 51 हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,व्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गांवकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)

अनंतरावभालेरावपुरस्कार,औरंगाबादविभाग (लातूरसह)- जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद

आचार्यअत्रेपुरस्कार, मुंबईविभाग- जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई

नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,पुणेविभाग- प्रमोद बोडके,बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर

शि.म.परांजपेपुरस्कार,कोकणविभाग- जान्हवी पाटील,वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी

ग.गो.जाधवपुरस्कार, कोल्हापूरविभाग- अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली

लोकनायकबापूजीअणेपुरस्कार, अमरावतीविभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला

ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,नागपूरविभाग- खेमेंद्र कटरे,जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स,गोंदिया

2016व 2017च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंहयांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत 2016 साठी पत्रकार राजीव कुलकर्णी, प्रवीण मुळ्ये, पांडुरंग मस्के, राजकुमार सिंग, निलेश खरे, रमाकांत दाणी, राहुल पांडे, बबन वाळके, नितीन तोटेवारयांचा तर 2017 च्या निवड समितीत पत्रकार विजय सिंह, क्लॅरा लुईस, सिद्धेश्वर डुकरे, उमेश कुमावत, भालचंद्र पिंपळवाडकर, शैलेंद्र तनपुरे, सत्यजित जोशी, विलास तोकले, कृष्णा शेवडीकर यांचा समावेश होता.
००००

Tuesday, October 9, 2018

चुकीच्या भारनियमनामुळे वीजनिर्मिती केंद्र असणाऱ्या परळीची जनता त्रस्त !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार -  बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ |प्रतिनिधी......

   ऐन सणासुदीच्या तोंडावर अन्यायकारक व    चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली आहे. या प्रश्नी आता जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.
    माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी भाररनियमनमुक्ती करून दाखवली होती . अजितदादांचा भारनियमन मुक्तीचा हा वारसा या सरकारने ना चालवला ना टिकवला. आता  ग्रामीण भाग आणि महानगरेही अंधारात आहेत. लोड शेडिंगमुळे त्रस्त जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार आहे.सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल.
       परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादल्यानंतर महावितरणने वीज निर्मीती करणाऱ्या परळी शहराला धक्का देण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे.  इमरजन्सी या गोंडस नावाखाली भारनियमन हा नवा प्रकार लागू करण्यात आला असून याअंतर्गत शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक तत्कालीन उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार उर्जामंत्री असताना वीजनिर्मिती केंद्र असलेली शहरे भारनियमन मुक्त ठेवण्याचा निर्णय झालेला होता. त्यानंतर आत्तापर्यंत हा नियम पाळण्यात येत होता. आता मात्र या सरकारच्या काळात वीजनिर्मिती केंद्र असणाऱ्या परळीलाही 'इमर्जन्सीचा' फटका बसत आहे. या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
      अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे अन्यथा  या प्रकरणी राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिला आहे.