Sunday, September 2, 2018

नाथ प्रतिष्ठानचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव मंडप उभारणी कामाचा ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ



नाथ प्रतिष्ठानचा  वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव
मंडप उभारणी कामाचा ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ

परळी वै.दि.02...................नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवात वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सावाचे आयोजन करण्यात येणार असुन, त्यासाठीच्या मंडप उभारणी कामाचा आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. 
मागील अनेक वर्षापासुन परळीत ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवात वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव या नावाने महोत्सव साजरा केला जातो. या वर्षी ही गणेश उत्सवाच्या 11 दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असनु, त्याची सुरूवात 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. या महोत्सावाच्या तयारीला सुरूवात झाली असुन, त्यासाठी वॉटरप्रुफ मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोंढा मैदान येथे करण्यात आला. तत्पुर्वी त्यांनी हनुमान मंदिरात जावुन दर्शनही घेतले. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, मार्केट कमिटीचे सभापती अ‍ॅड.गोविंद फड, जिल्हा सरचिटणीस मधुकर आघाव, माऊली गडदे, युवक प्रदेशउपाध्यक्ष अजय मुंडे, उपनगराध्यक्ष आय्युब भाई पठाण, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, माणिकभाऊ फड, शरदभाऊ मुंडे, प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी, नगरसेवक अनिल अष्टेकर, सभापती गोपाळ आंधळे, भावड्या कराड, दिपक देशमुख, पंचायत समिती उपसभापती पिंटु मुंडे, राजेंद्र सोनी, बालाजी दहिफळे, महिला आघाडीच्या आर्चना, रोडे, रेश्माताई गित्ते, प्रितम जाधव, रामदास कराड, विजय भोयटे, सुर्यकांत मुंडे, युवक नेते अभय मुंडे,प्रदिप जाधव, अमित केंद्रे, किशोर केंद्रे,  महेंद्र रोडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 
--------------------------------------------------------

1 Comments:

At September 3, 2018 at 3:19 AM , Blogger माझी बातमी said...

This comment has been removed by the author.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home