Monday, September 3, 2018

पोळा सणा आला पाच दिवसावर, बाजारात सुकसुकाट

पोळा सणा आला पाच दिवसावर, बाजारात सुकसुकाट


परळी वै.प्रतिनिधी दि.03

 सोमवारी परळी येथील अठवडी बाजारात आशा पध्दतीने साज खरीदिच्या दुकानात  सुकसुकाट दिसत होता

पोळा हा सण कृषी संस्कृतीतला महत्त्वाचा सण या दिवशी बळीराजा आपल्या बैलांची पुजा करतो.वर्षभर ज्यांच्या मानेवर जु असते . ते खांदे मळले जातात बैलांना स्वच्छ धुवून अंघोळ घातली जाते. जाण व झुल घालून सजावट करण्यात येते.यंदा माञ पुरेसा पाऊस नसल्याने बाजारात सुकसुकाट दिसून येत आहे.बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच समाधान दिसत नाही . मोठा पाऊस नसल्याने तलाव अद्याप पर्यंत भरलेले नाहीत .नद्यांना पूर आला नसल्याने नद्या वाहील्या नाहीत .सद्याची परिस्थिती पहाता बळीराजा हा पोळा जड अंतःकरणानेच करेल असी स्थिती दिसत आहे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home